Trending
recent

आईचं काय ?




रात्रीचे बारा वाजले होते. नवरा उशिरा घरी आला. बायको रागावली होती.
बायको: कुठे होतात दिवसभर? ऑफिस मधून पण दुपारीच निघालात.
नवरा: अग मी ना...ते आपल..हे...

बायको: (नवर्याचे ऐकून आणखी रागावून) आता का गप्प? सांगा ना कुठे शेण खायला गेला होतात? आणि ही घाणेरडी ट्रंक आणि भिकारडी वळकटी कोणाची?

नवरा: (थोड़ा धीर जमावून) अग आईला आपल्या घरी आणायला गेलो होतो!
बायको: काय? कशाला आणलत तुमच्या आईला इथे? तुमच्या भावांकडे सोडायच होतत तिला.
(
आई बिचारी दरवाज्याबाहेर काळोखात पदराने डोळे पुसत उभी असते. बायकोला तिला आत या असे पण सांगावेसे वाटत नाही. संतापलेली बायको तिच्याकडे पहात पण नाही.)

नवरा: (अगतिकपणे) तिला माझ्या भावांकडे सोडण शक्य नाही! प्लीज समजून घे!
बायको: का आपल्याकडे कुबेरचा खजिना आहे वाटत? तुमच्या दहा हजार पगारात आपलच भागात नाही. आता आई कशाला आणखी?
नवरा: (निग्रहाने) आई इथेच राहील!

बायको: हो का? मग ह्या घरात एकतर ती राहील किंवा मी! आणि ही पण निर्लज्जपणे आली इथे. काय हो कशाला आलात आमच्या संसारात विष कालवायला? ( हे विचारात बायको बाहेरचा दिवा लाऊन दरवाज्याबाहेर जाते. मगाशी काळोखात उभ्या आईने डोळे पुसणारा पदर चेहर्यावरून बाजूला केलेला असतो. तिला पाहुन हादरलेली बायको दोन पावल मागे सरकते आणि म्हणते...)
.
.
.
.
.
आई तू???
.
.
आई: हो मीच. तुझ्या भावांनी आणि त्यांच्या बायकांनी मला खूप छळल आणि घराबाहेर काढल. मी जावईबापूंना फोन केला आणि ते लगेच मला न्यायला आले!
(
आपल्या आईची कहाणी ऐकून क्षणभर सुन्न होते. डोळे पाण्याने डबडबतात. पण क्षणात अश्रु पुसून नवर्याकडे लाडिक कटाक्ष टाकत बायको वदते..)

बायको: (लाडात येत) तुम्हीपण ना अगदी अस्से आहात. जा बाई. कित्ती दिवसांनी इतक छान सरप्राइज दिलत! थॅंक यु डार्लिंग! (आईकडे वळत) चल आई. दमली असशील. जेऊन घे गरमगरम!

नवराच्या आईचं काय ?

Hot Bolly Dolly

Hot Bolly Dolly

Powered by Blogger.