जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन
आता आई कडुन फुटली
तर तिला काहीही बोलु नका
जेव्हा मागत होते फुगा
लहानपणी आई जवळ
आता आई चष्मा मागते
तर तिला नाही म्हणु नका
जेव्हा मागत होते चॉकलेट
लहानपणी आई जवळ
आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका
आई रागवत होती तुम्हाला
जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही
आता तिला ऐकु येत नाही
तर तिला रागावु नका
जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती
आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या
जेव्हा रडत होते तुम्ही
आई छातीला लावत होती
आता सहन करा दु:ख तुम्ही
तिला रडु देवु नका
जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा .....
आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा... जे
तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण
करतात...